गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

एक परीराणी

रुसून बसली एक परीराणी 
फुगले गाल राग त्या नयनी 
हळूच हसे ती चोरून नजरा 
कसला हा तिचा अनोखा नखरा 

शब्दही अडले तिच्या ओठी 
नाजाने कशी हि सुटेल गोची 
हळवा राग तिचा मझ्यावर 
कोरला आघात हा मी मनावर 

रुसलो मग मी हि जरासा 
अट्टाहास दाखिवला काहीसा 
फिरवल्या नजरा तिच्यावरून 
निघालो एकलाच त्या मार्गावरून 

अखेर फुटला बांध तिच्या ओठांचा 
अनावर अश्रू तिला त्या क्षणाचा 
मिटून नजरा हळूच शिरली कुशीत 
गहिवरलो काहीसा मीही त्या खुशीत 

मावळला खेळ हा रूसव्याचा 
सावळा रंग त्या क्षणी मनांचा 
अबोल काहीसा खेळ सावल्यांचा  
मनी मात्र गंध फक्त तिच्या प्रीतीचा
                             ---रामचंद्र म. पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा