गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

एक परीराणी

रुसून बसली एक परीराणी 
फुगले गाल राग त्या नयनी 
हळूच हसे ती चोरून नजरा 
कसला हा तिचा अनोखा नखरा 

शब्दही अडले तिच्या ओठी 
नाजाने कशी हि सुटेल गोची 
हळवा राग तिचा मझ्यावर 
कोरला आघात हा मी मनावर 

रुसलो मग मी हि जरासा 
अट्टाहास दाखिवला काहीसा 
फिरवल्या नजरा तिच्यावरून 
निघालो एकलाच त्या मार्गावरून 

अखेर फुटला बांध तिच्या ओठांचा 
अनावर अश्रू तिला त्या क्षणाचा 
मिटून नजरा हळूच शिरली कुशीत 
गहिवरलो काहीसा मीही त्या खुशीत 

मावळला खेळ हा रूसव्याचा 
सावळा रंग त्या क्षणी मनांचा 
अबोल काहीसा खेळ सावल्यांचा  
मनी मात्र गंध फक्त तिच्या प्रीतीचा
                             ---रामचंद्र म. पाटील

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

अश्रु

अश्रुंचे धार अजून ओसंडत होते 
ओठांचे थरथरणे तेवत होते 
शमले नव्हते अजूनही हे नाते 
जणू धागे क्षणाचे तुटले नव्हते 

हाताना भास होते तुझ्या स्पर्शाचा 
मनाला आधार होता तुझ्या हास्याचा 
सवयी होत्या तुझ्या सहवासाच्या 
जणू हळवे मन अजूनही भरले नव्हते 

अखंड वाट पाहत राहायच होता 
तुला आठवून हसायचं होता 
पाऊलवाटाणा टिपायच होता  
तुझं जाण अजून मान्य नव्हते
                        ---रामचंद्र म. पाटील


सोमवार, १४ जानेवारी, २०१३

तू असलीस कि

तू असलीस कि मनी एक वेगळाच नाद असतो 
गर्दीत हि बाग फुलावी असा प्रेमळ आभास असतो 
कटू उन्हातही तुझ्या सावलीत क्षणभंगुर असतो 
मनी मात्र तुझ्या आठवणीचा कल्लोळ असतो 

तू असलीस कि स्वप्नाची बहर फुललेली असते 
मिठीत तुझ्या मझी दुनिया सामावली असते  
नाजाने एक अबोल दुनिया मनी वसलेली असते
क्षणा क्षणाला ओठांवर एक वेगळीच कहाणी असते

तू असलीस कि   दुःख जणू ठेगणे वाटते  
सुखं चार क्षणाचं मज आकाश्पारी वाटते 
स्वप्नातले घरटे कळीपारी फुलवावे वाटते 
दुरुनी फक्त तुलाच निरखून पाहावे वाटते 

तू असलीस कि तुझ्यातच विरघळून जातो 
आठवून क्षण विरहाचे क्षणात विसकटून जातो 
आपसूक मग मी माझ्यातच हरवून जातो 
असून नसलेला मी पुन्हा एकांत शोधत जातो
                                              ---रामचंद्र म. पाटील