मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

नातं...!

श्बादांच्या बंधनात अडकलेलं नातं
आज मोकळ्या हवेत खुलत होतं
वार्याच्या प्रवाहात दूरवर दरवळत होत
नकळत एक अनामिक वाट चालत होतं

डोळ्यातला ओलावा आज कोरडा होता
जग जिंकल्या पेक्षा जास्त आनंद होता
चंचल तिच्या डोळ्यात एकटक पाहत होतो
पहाटेच स्वप्न भर दुपारी सजवत होतो

तिच्यासवे प्रत्येक क्षण मी जपत होतो
आठवणीच्या पुस्तकात उमटवत होतो
तिच्या अस्तित्वाची जाणीव रेखाटत होतो
तिच्यासवे पुस्तकाला अगदी जीवाशी जपत होतो

गाली खळी पडून तीही गोड हसली होती
जणू काट्यानसवे गुलाबाची कळी रुतली होती
माझ्या स्वप्नांना ती हि रंगवत होती
नकळत अनाकिम नात्याला नाव देत होती
                                              ---रामचंद्र म. पाटील

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

तुझ्या स्वप्नातला ...फक्त स्वप्नातलाच

दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं..
                   कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो ,
डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..
                   कि मला तुझी आठवण येत नाही ,
गर्दीत असतो नेहमी याचा अर्थ असा नाहीये गं ..
                   कि मी मानल तुझा आयुष्यातून जाणं,
येणाऱ्या-जाणार्याशी हसतो याचा अर्थ असा नाहीये गं..
                   कि मला विरह नाही तुझ्या नसण्याचा ,
दिवस ढकलत निघालोय याचा अर्थ असा नाहीये गं.
                   कि मला जगण्याची इच्छा आहे
प्रेम नाहीये म्हणतोय याचा अर्थ असा नाहीये गं...
                   कि मी तुझ्यावर प्रेम करायचं विसरलोय
सगळ आहे तसच आहे याचा अर्थ असा आहे ..
                  कि मी अजूनही त्याच वळणावर आहे,
                  मी अजूनही खूप प्रेम करतो तुझ्यावर ,
                  मी अजूनही तुझ्या आठवणीत रात्र रात्र जगतो,
                  मी अजूनही तुझी वाट पाहत आहे.
मी अजूनही तसाच आहे ....तुला हवा तसा....तुझ्या स्वप्नातला ...फक्त स्वप्नातलाच ...:)
                                                                                      ---रामचंद्र म. पाटील

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

जमलंच तर आज पुन्हा जिवंत होईन.

जमलंच तर आज पुन्हा तुझ्यापाशी येईन
पुन्हा तुला तशीच मिठीत घेईन
जमलंच तर
आज पुन्हा त्या समुद्र किनारी जाईन
हक्काने तुझा हात हातात घेईन
जमलंच
आज तर पुन्हा त्याच वाटेवर असेन
तुझ्या सावलीत धडपडत असेन
जमलंच
आज तर पुन्हा तीच संध्यकाळ होईन
सोनेरी किर्नाणाई तुला निहाळत असेन
जमलंच तर
आज पुन्हा तोच ओघळता थेंब होईन
तुझ्या गालावरून निसटत विरून जाईन
जमलंच तर आज  पुन्हा जिवंत होईन
आधी तुझ्याकडे आत्ता यामा कडे गाह्रण गाईन

 जमलंच तर आज पुन्हा जिवंत होईन.................
                                              ---रामचंद्र म. पाटील

एक आठवण

एक आठवण आपण जपलेली
आयुष्याच्या पुस्तकात लपवलेली
लोकांच्या नजरेतून चोरलेली
कमळाच्या फुलात ठेवलेली
एक आठवण आपण जपलेली...!


एक आठवण आपण जपलेली
कोमल मनातली प्रीत खुललेली
गुलाबी लाली चेहऱ्यावर आलेली
स्वप्नाच्या पलीकडे वसलेली
एक आठवण आपण जपलेली...!

एक आठवण आपण जपलेली
मनाच्या सभोवताली दर्वलेली
चोरून नजरेत टिपलेली
एकमेकांची मनं आपसूक वेधलेली
एक आठवण आपण जपलेली...!

एक आठवण आपण जपलेली
नकळत आपलीशी झालेली
विरहाच्या शब्दाने हिरमुसलेली
दोघांच्या नयनातून ओघळलेली
एक आठवण आपण जपलेली
                                      ---रामचंद्र म. पाटील

शब्द


शब्दांनाही पाहिलय कधीतरी हट्टी होताना,
खूपकाही बोलायच असून अबोल अबोल राहताना,
शब्दांनीच शिकवलय रङतारङता हसायला पङता पङता सावरयला,
शब्दांमुळेच कधी कधी एखादयाचा होतो घात
शब्दांमुळे मिळते एखादयाची आयुष्यभर साथ.
शब्दांमुळे जुळतात मना मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो एखादयाचा पारा,
शब्दच जपुन ठेवतातत्या गोङ आठवणी
शब्दांमुळे तरळते कधीतरी ङोळ्यात पाणी..

बरचसं काही मनात होतं


बरचसं काही मनात होतं
ओठांवर कधी आलचं नाही
चालला होता फक्त नजरेच खेळ
तोही तिला कधी उमगला नाही
मी मात्र तिच्यामध्ये हरवलेला
ती मात्र जाणून अजाण होती
रंगवली होती बरीच स्वप्न ..
अस्तित्वात मात्र कोरडी राहिली
निघून गेलीस तू त्या वळणावरून
मी मात्र क्षणांना वेचण्यात गुंतलो
तू तुझीच राहिलीस सये
माझी कधी झालीच नाही
तू माझी झाली असतीस
पण तू कधी प्रेम केलच नाहीस..

                                              ---रामचंद्र म. पाटील